लाडकी बहीण योजनेला धक्का: तांत्रिक त्रुटींमुळे लाखो अर्ज बाद, जाणून घ्या सविस्तर माहिती
रत्नागिरी:
महिला व बाल कल्याण विभागामार्फत राबवण्यात येत असलेल्या योजनेच्या अंमलबजावणीत मोठी बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील तब्बल १ लाख ५ हजार ५२१ महिलांचे अर्ज विविध तांत्रिक त्रुटी आणि निकषांची पूर्तता न केल्यामुळे अपात्र ठरवण्यात आले आहेत.
प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ३ लाख ७७ हजार ४७७ अर्ज प्राप्त झाले होते. यापैकी २ लाख ७१ हजार ९५६ पात्र महिलांच्या बँक खात्यावर योजनेचा लाभ यशस्वीरीत्या जमा करण्यात आला आहे. या पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात आतापर्यंत ४० कोटी ६६ लाख रुपयांपेक्षा जास्त निधी थेट वर्ग करण्यात आला आहे.
दुसरीकडे, मोठ्या संख्येने अर्ज अपात्र ठरल्यामुळे शासनाचा महिन्याला होणारा सुमारे १५ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी वाचला आहे.
