खेड: मुंबई-गोवा महामार्गावर रात्री २ च्या सुमारास अनुसया हॉटेलजवळ मोठी दरड कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक रात्रभरापासून बंद करण्यात आली आहे.
दरड कोसळल्याची माहिती मिळताच भाजप नेते आणि माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी भाजपच्या आपत्ती व्यवस्थापन टीमसह घटनास्थळी धाव घेतली. महामार्गावर अडकलेल्या प्रवाशांना दिलासा देण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने पिण्याचे पाणी आणि बिस्किटांचे वाटप करण्यात आले. रस्ता वाहतुकीसाठी लवकरात लवकर मोकळा व्हावा, यासाठी वैभव खेडेकर यांनी स्थानिक जेसीबी आणि ट्रक चालकांशी संपर्क साधून तातडीने मदत कार्य सुरू करण्याचे प्रयत्न केले.
यावेळी स्वराज गांधी, विवेक गांधी, इंदरकुमार रायका, सोशल मीडिया प्रमुख सर्वेश पवार यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
