खेड : खेडच्या कशेडी घाटातून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. कशेडी घाटात दरड कोसळल्यामुळे काही काळ मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.
घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने तातडीने आपली यंत्रणा घटनास्थळी रवाना केली आणि दरड हटवण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेतले. या बचाव कार्यामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.
आता प्रशासनाच्या अथक प्रयत्नांमुळे रस्ता मोकळा झाला असून, वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सध्या घाटात पोलिसांच्या नियंत्रणाखाली एकेरी वाहतूक सुरळीत सुरू करण्यात आली आहे.
दरड हटवण्याचे उर्वरित काम अद्याप सुरू आहे. त्यामुळे सर्व वाहनचालकांना विनंती आहे की, त्यांनी प्रवास करताना सावधगिरी बाळगावी, वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे आणि अनाठायी घाई टाळावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
