रत्नागिरी : प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते प्रवीण तरडे यांनी नुकतीच रत्नागिरी दौऱ्यावर असताना एक मोठी घोषणा केली आहे. त्यांनी त्यांच्या आगामी ‘देऊळ बंद ३’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाची घोषणा केली असून, याचे चित्रीकरण कोकणातील गुहागर येथे होणार असल्याचे सांगितले आहे.
उदय सामंत यांच्या आग्रहामुळे प्रवीण तरडे यांनी ‘देऊळ बंद ३’ चे चित्रीकरण कोकणात करण्याचे ठरवले आहे. चित्रपटाचे चित्रीकरण प्रामुख्याने गुहागर आणि रत्नागिरी भागात केले जाणार आहे.या चित्रपटाच्या पहिल्या भागात कोकणातील स्थानिक कलाकारांना मोठी संधी दिली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
‘देऊळ बंद ३’ हा चित्रपट दोन भागांत चित्रित केला जाणार असून, त्यानंतर उर्वरित चित्रीकरण अमेरिकेत होणार आहे. ‘देऊळ बंद २’ चित्रपटातून मिळालेला नफा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी अर्पण करत असल्याचेही त्यांनी नमूद केले. रत्नागिरीतील श्री स्वामी समर्थ मंदिरात दर्शन घेतल्यानंतर त्यांनी ही घोषणा केली
कोकणातील कलाकारांना मोठी संधी! प्रवीण तरडेंनी ‘देऊळ बंद ३’ च्या शूटिंगसाठी निवडले गुहागर
Leave a Comment
