अझिझा दाऊद नाईक हायस्कूलचा सलग यशाचा टप्पा; एसएससी परीक्षेत १००% निकाल

Shabbir Vasta
1 Min Read

रत्नागिरी:  आयडियल एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी संचलित ‘अझिझा दाऊद नाईक हायस्कूल’ने दरवर्षीप्रमाणे यंदाही आपल्या यशाची परंपरा कायम राखली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या मार्च २०२६ च्या एस.एस.सी. बोर्ड परीक्षेचा शाळेचा निकाल १००% लागला असून, विद्यार्थिनींनी उत्तुंग यश संपादन केले आहे.एकूण विद्यार्थी १६७ (सर्व उत्तीर्ण) झाले. प्रथम श्रेणी  ५६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

गुणवंत विद्यार्थ्यांची नामावली (Top 3):
१. प्रथम: कुमारी ठाकूर आयेशा झहूर – ९४.००% (४७०/५००)
२. द्वितीय:कुमारी मुकादम नुसरत इप्सान – ९३.८०% (४६९/५००)
३. तृतीय: कुमारी बुड्ये रैना सुहैल अली – ९२.२०% (४६१/५००)


विषयनिहाय विशेष प्राविण्य:
शाळेच्या सर्वच विषयांचा निकाल १००% लागला आहे. उर्दू विषयात आयेशा झहूर हिने सर्वाधिक ९७ गुण मिळवले, तर इंग्रजी विषयात आरिशा मजगावकर हिने ९७ गुणांसह बाजी मारली. विज्ञान विषयात नुसरत मुकादम हिने ९७ गुण मिळवून विशेष यश संपादन केले आहे.


शाळेतील पहिल्या १० विद्यार्थ्यांची यादी:
शाळेच्या गुणवत्ता यादीत पहिल्या दहामध्ये मुजवर मुझम्मील इक्बाल अहमद (९१.८०%), मोंगल आयशा इमरान (९१.६०%), राजपूरकर अमिना अब्दुल कादिर (९०.६०%), सोलकर फिदयान मश्कूर (९०.४०%), चोगले खादिजा रिझवान (८९.६०%), माजगावकर आरिशा मुख्तार (८९.००%) आणि साखरकर मरयम अमानुल्ला (८८.४०%) यांचा समावेश आहे.
या यशाबद्दल शाळेचे शिक्षक, मुख्याध्यापक आणि संस्थेच्या वतीने सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे अभिनंदन करण्यात येत आहे. रत्नागिरी शहरात या घवघवीत यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *