खेड:
शिवसेना नेते रामदास कदम यांनी सोमवारी दुपारी खेड शहरातील पूरग्रस्त भागाला भेट देऊन व्यापारी आणि नागरिकांशी थेट संवाद साधला. यावेळी त्यांनी नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करून नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या.
खेड शहरातील पुरामुळे व्यापारी व नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पूरग्रस्तांना लवकरात लवकर मदत मिळवून देण्यासाठी, ४८ तासांच्या आत पंचनामे पूर्ण करावेत असे स्पष्ट निर्देश त्यांनी दूरध्वनीद्वारे प्रांताधिकारी वैशाली पाटील यांना दिले. प्रशासनाने तातडीने कार्यवाही करून नागरिकांना शासनाची मदत मिळवून द्यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
पुराच्या संकटानंतर शहरात स्वच्छता मोहीम राबवणाऱ्या नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या कार्याचे रामदास कदम यांनी विशेष कौतुक केले. प्रतिकूल परिस्थितीत कर्मचाऱ्यांनी केलेल्या या कामाचा निश्चितच गौरव केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
या दौऱ्यावेळी जिल्हा परिषद सदस्य अरुण उर्फ चंद्रकांत कदम, शहराध्यक्ष कुंदन सातपुते, नगराध्यक्ष माधवी बुटाला, गटनेते निकेतन पाटणे, नगरसेवक संजय मोदी, स्वप्नील सैतवडेकर, संजना कुडाळकर, सुनील दरेकर, तौसिफ खोत आणि कौशल जाडकर यांच्यासह पदाधिकारी, शिवसैनिक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवसेना नेते रामदास कदम यांनी घेतली पूरग्रस्त भागाची पाहणी,
पूरग्रस्तांच्या समस्या जाणून घेतल्या
Leave a Comment
