मुंबई: महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळातर्फे उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या पाठ्यपुस्तकांपैकी काही इयत्तांची पाठ्यापुस्तके शैक्षणिक वर्ष 2026-27 मध्ये बदलणार आहेत. त्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावी या इयत्तांना नवीन पाठ्यपुस्तके लागू होणार असून, पाचवी, सातवी, नववी आणि अकरावी या इयत्तांच्या पाठ्यपुस्तकांचे शेवटचे वर्ष असणार आहे. या पाठ्यपुस्तकांची खरेदी आवश्यकतेनुसार करावी, अशी सूचना बालभारतीने केली.
बालभारतीच्या संचालक अनुराधा ओक यांनी याबाबतची माहिती प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली. २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात जून 2026 मध्ये इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी, आणि सहावीची पाठ्यपुस्तके नव्याने प्रकाशित होणार आहेत. त्यामुळे पालकांनी नवीन अभ्यासक्रमाची पाठ्यपुस्तके खरेदी करावीत.तर शैक्षणिक वर्ष २०२६-२७ हे इयत्ता पाचवी, सातवी, नववी आणि अकरावी या इयत्तांच्या पाठ्यपुस्तकांचे शेवटचे वर्ष असणार आहे. त्यामुळे या इयत्तांच्या पाठ्यपुस्तकांची खरेदी आवश्यकतेनुसार करावी, अशा सूचना बालभारतीतर्फे संबंधितांना करण्यात आल्या आहेत.
इयत्ता दुसरी, तिसरी,चौथी व सहावीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमासाठी ‘शिकू मराठी आनंदे’ तसेच हिंदी, उर्दू ,गुजराती, कन्नड, सिंधू, तेलगू, तमिळ आणि बंगाली या इतर माध्यमांसाठी ‘करू मैत्री मराठीशी’ ही मराठी भाषेची अनिवार्य पुस्तके उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
पाचवी, सातवी, नववी, अकरावीचे अभ्यासक्रम पुढच्या वर्षी बदलणार
Leave a Comment
