मुंबई:
राज्यातील शाळा नवीन शैक्षणिक वर्षात ऑनलाईन सुरू होणार की ऑफलाईन, याबाबत गेल्या काही दिवसांपासून पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला होता. सोशल मीडियावर विविध उलट-सुलट चर्चा आणि अफवा पसरत असल्याने अनेक पालक चिंतेत होते. मात्र, आता शालेय शिक्षण विभागाने या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
राज्यातील शाळा यंदाही प्रत्यक्ष म्हणजेच ऑफलाईन पद्धतीनेच सुरू होणार असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. राज्य सरकारकडे शाळा ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्याचा कोणताही प्रस्ताव किंवा विचार विचाराधीन नाही.
शिक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार १५ जूनपासूनच होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना नेहमीप्रमाणे शाळेत उपस्थित राहूनच आपले शिक्षण घ्यावे लागणार आहे. पालकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
राज्यातील शाळा ऑनलाईन नव्हे, ऑफलाईनच सुरू होणार; शिक्षण विभागाचा मोठा खुलासा…
Leave a Comment
