अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याचे संकट; कोकण किनारपट्टीवर मासेमारी ठप्प!

Shabbir Vasta
1 Min Read

रत्नागिरी: गेल्या काही दिवसांपासून कोकण किनारपट्टीसह रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यांच्या संकटामुळे मच्छीमार बांधव मोठ्या अडचणीत सापडले आहेत. निसर्गाच्या या लहरीपणासोबतच सध्या डिझेलच्या टंचाईची भर पडल्याने मासेमारी व्यवसायाला मोठा फटका बसला आहे.
समुद्रात निर्माण झालेल्या वादळसदृश परिस्थितीमुळे मासेमारीवर याचा थेट परिणाम झाला असून, खबरदारीचा उपाय म्हणून अनेक नौका मालकांनी आपल्या बोटी समुद्रात न नेतो किनाऱ्यावरच सुरक्षित ठेवणे पसंत केले आहे.
रत्नागिरीसह शेजारील जिल्ह्यांमध्येही अवकाळी पावसाने मोठे नुकसान केले आहे. सध्या समुद्रात वाऱ्याचा वेग प्रचंड असल्याने मच्छीमारीसाठी खोल समुद्रात जाणे अत्यंत धोक्याचे ठरत आहे. त्यामुळे कोणताही जिवाचा धोका न पत्करता मच्छीमार सध्या जवळच्या भागातच मासेमारी करत आहेत. तर दुसरीकडे, दापोली तालुक्यातील प्रसिद्ध हर्णे किनाऱ्यावर सुमारे १५० ते २०० बोटी सुरक्षिततेसाठी लागून आहेत.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *