रत्नागिरी :
रत्नागिरी तालुका शिवसेनेच्या वतीने इयत्ता १० वी आणि १२ वीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा ‘गुणगौरव सोहळा’ आयोजित करण्यात आला आहे. उद्या, रविवार १९ जुलै २०२६ रोजी सकाळी १० वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृह, मारुती मंदिर, रत्नागिरी येथे हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करण्यासाठी आणि त्यांना पुढील वाटचालीस प्रोत्साहित करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
