शब्दाला जागणारे नेतृत्व! अजितदादांचा ‘तो’ शब्द सुनेत्राताईंनी पाळला; सावर्डे येथील विवाहसोहळ्यात जिव्हाळ्याचे दर्शन

Shabbir Vasta
1 Min Read

आमदार शेखर निकम यांच्या मुलीच्या विवाहसोहळ्याला लावली उपस्थिती

सावर्डे :
राजकारणात ‘दिलेला शब्द’ म्हणजे काळ्या दगडावरची रेघ, हे समीकरण पवार कुटुंबाने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांनी आमदार शेखर निकम यांना दिलेला शब्द त्यांच्या पश्चातही खाली पडू न देता, सुनेत्राताई पवार यांनी चिपळूणच्या सावर्डे येथे विवाहसोहळ्याला प्रत्यक्ष उपस्थिती लावली. या कृतीने पवार आणि निकम कुटुंबातील ऋणानुबंधांची सर्वत्र चर्चा रंगली आहे.

नाती जपण्याची ‘पवार’ परंपरा
राजकारणातील धावपळ आणि व्यस्त वेळापत्रक बाजूला सारून, सुनेत्राताई पवार यांनी खास वेळ काढून आमदार शेखर निकम यांच्या कन्येच्या विवाह सोहळ्याला हजेरी लावली. केवळ एक राजकीय शिष्टाचार म्हणून नव्हे, तर स्व. अजितदादांनी दिलेला शब्द आणि निकम कुटुंबाशी असलेले घरगुती नाते जपण्यासाठी त्यांनी ही उपस्थिती दर्शवली.
       स्व. अजितदादांच्या निधनानंतरही त्यांनी दिलेले शब्द आणि नातेसंबंध पवार कुटुंबाकडून तितक्याच निष्ठेने जपले जात असल्याचे दिसून आले. सुनेत्राताईंनी वधू-वरांना आशीर्वाद दिले आणि निकम कुटुंबियांशी संवाद साधला, तेव्हा उपस्थितांना पवार-निकम यांच्यातील अनेक वर्षांच्या जिव्हाळ्याच्या नात्याची प्रचिती आली.या दिमाखदार सोहळ्याला राज्यातील अनेक दिग्गज उपस्थित होते, मात्र सुनेत्राताईंच्या उपस्थितीने हा सोहळा खऱ्या अर्थाने लक्षवेधी ठरला.
     राजकारण आपल्या जागी असते, पण दिलेला शब्द आणि माणसांशी जोडलेली नाती हीच खरी संपत्ती आहे, हे आजच्या उपस्थितीने पुन्हा एकदा स्पष्ट झाले.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *