सामाजिक कार्यकर्ते जकी खान यांच्या वाढदिवशी तरुणाई सरसावली; १६६ बॅग रक्त संकलित!

Shabbir Vasta
2 Min Read

रत्नागिरीत मसिहा फाउंडेशन आणि शिवखोल फ्रेंड्स सर्कलचे शिस्तबद्ध नियोजन; सर्व स्तरातून कौतुक!

रत्नागिरी:
सामाजिक कार्यकर्ते जकी खान यांच्या वाढदिवसानिमित्त रत्नागिरीत एका भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मसिहा फाउंडेशन पुरस्कृत आणि शिवखोल फ्रेंड्स सर्कल रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात पार पडलेल्या या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या शिबिरात एकूण १६६ रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान केले. रत्नागिरी शहर आणि परिसरातील युवक तसेच महिलांनी मोठ्या संख्येने पुढे येत या मोहिमेत सहभाग घेतला.

सध्या रुग्णालयांमध्ये रुग्णांची संख्या वाढत असून रक्ताचा पुरवठा कमी पडत आहे. हीच गरज ओळखून, रक्तदान शिबिरांचे विक्रमवीर म्हणून ओळखले जाणारे जकी खान यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. जकी खान हे मसिहा फाउंडेशनच्या माध्यमातून नेहमीच गोरगरीब आणि गरजू लोकांना मदतीचा हात देत असतात. त्यांच्या या सामाजिक कार्याला हातभार लावण्यासाठी शेकडो तरुण आणि महिलांनी स्वेच्छेने रक्तदान करून समाजासमोर एक नवा आदर्श ठेवला आहे. या कौतुकास्पद उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

जिल्हा शासकीय रुग्णालयात या संपूर्ण शिबिराचे अत्यंत शिस्तबद्ध नियोजन करण्यात आले होते. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय पथक आणि रक्तपेढीतील सर्व कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.

याप्रवेळी मसिहा फाउंडेशन आणि शिवखोल फ्रेंड्स सर्कल रत्नागिरीचे सर्व पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिबिराच्या शेवटी दोन्ही संस्थांच्या वतीने सर्व रक्तदात्यांचे, वैद्यकीय पथकाचे आणि उपस्थित नागरिकांचे आभार मानण्यात आले.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *