कोकण पदवीधर निवडणूक: ‘घोडेबाजार’ टाळण्यासाठी बाळ मानेंची माघार! नितेश राणेंच्या उपस्थितीने महायुतीची पकड मजबूत

Shabbir Vasta
1 Min Read

रत्नागिरी :
कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीतून एक अत्यंत मोठी आणि राजकीय समीकरणे बदलून टाकणारी घडामोड समोर आली आहे. महायुतीचे नेते बाळ माने यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला असून, या निर्णयामुळे कोकणच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
अर्ज मागे घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना बाळ माने यांनी थेट आणि रोखठोक भूमिका मांडली. कोकणातील प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या या पदवीधर मतदारसंघात पैशाचा आणि सत्तेचा प्रचंड गैरवापर होऊन “घोडेबाजार” होऊ नये, यासाठीच आपण अत्यंत विचारपूर्वक हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “कोकणच्या राजकीय स्वच्छतेसाठी आणि नैतिकतेसाठी हा टप्पा अत्यंत महत्त्वाचा आहे,” असेही माने यांनी यावेळी नमूद केले.
     बाळ माने यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतल्यामुळे कोकण विधान परिषद निवडणुकीचे संपूर्ण गणित आता पालटले आहे. अर्ज मागे घेतेवेळी भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांची असलेली सक्रिय उपस्थिती बरीच बोलकी ठरली. नितेश राणे यांच्या या डॅशिंग एन्ट्रीमुळे महायुतीने कोकणात पुन्हा एकदा आपली वज्रमूठ आणि पकड मजबूत असल्याचा थेट संदेश विरोधकांना दिला आहे. बाळ मानेंच्या या अनपेक्षित खेळीमुळे महायुतीची ताकद कमालीची वाढली असून, विरोधकांच्या रणनीतीला मात्र मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे.
     आता कोकण पदवीधर मतदारसंघात महायुतीचे पारडे प्रचंड जड झाले असून, नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने खेळलेली ही राजकीय खेळी या निवडणुकीची अंतिम दिशा ठरवणारी ठरणार, हे आता स्पष्ट झाले आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *