रत्नागिरी:
रत्नागिरी जिल्ह्यात व्यावसायिक गॅस सिलेंडरचा प्रचंड तुटवडा निर्माण झाल्याने हॉटेल उद्योग कोलमडला आहे. अनेक छोट्या हॉटेल चालकांनी पोटासाठी जुन्या चुली पेटवल्या आहेत, तर मोठ्या हॉटेल्सना टाळे ठोकण्याची वेळ आली आहे.
गॅसअभावी जिल्ह्यातील शेकडो हॉटेल्स बंद पडण्याच्या मार्गावर असून पर्यटन व्यवसायालाही मोठा फटका बसला आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली.
ज्या हॉटेल्सना शक्य आहे, त्यांना तातडीने ‘महानगर गॅस’ची पाईपलाईन जोडणी देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. गॅस वितरणात पारदर्शकता ठेवण्यासाठी उपविभागीय अधिकारी जीवन देसाई यांची विशेष समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ज्या छोट्या व्यावसायिकांना एका सिलेंडरवर १५-२० दिवस काढता येतात, त्यांना साठा उपलब्ध होताच प्राधान्याने पुरवठा करण्याचे आदेश दिले आहेत.
प्रशासनाच्या या आक्रमक पवित्र्यामुळे संकटात सापडलेल्या हॉटेल व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
सिलेंडरअभावी रत्नागिरीतील हॉटेल व्यवसाय संकटात
Leave a Comment
