रत्नागिरी:
जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळातून आणखी एक महत्त्वाची आणि मोठी घडामोड समोर आली आहे. युवासेना रत्नागिरी तालुकाप्रमुख तुषार साळवी यांची शिवसेना पक्षाच्या “युवासेना दक्षिण रत्नागिरी जिल्हाप्रमुख” पदी अधिकृत निवड करण्यात आली आहे. मुन्ना देसाई यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे हे पद रिक्त झाले होते, त्यावर आता पक्षाने साळवी यांची अधिकृत नियुक्ती केली आहे.
युवासेनेचे सचिव आणि कोअर कमिटी सदस्य विकास भरतशेठ गोगावले यांच्या स्वाक्षरीने १० जून २०२६ रोजी हे अधिकृत नियुक्ती पत्र जारी करण्यात आले. वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने, तसेच शिवसेनेचे मुख्य नेते व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड जाहीर करण्यात आली आहे.
युवासेनेचे वरिष्ठ नेते पूर्वेशभाई सरनाईक यांच्या आदेशानुसार आणि कोकण विभागाचे युवासेना सचिव विकास गोगावले यांच्या सूचनेनुसार हे नियुक्ती पत्र साळवी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
युवासेना दक्षिण रत्नागिरी जिल्हाप्रमुखपदी तुषार साळवी यांची अधिकृत निवड!
Leave a Comment
