डिजिटल माध्यमांतून रंगणार थेट प्रक्षेपण
रत्नागिरी (प्रतिनिधी):
मिरकरवाडा येथील दिलदार क्रिकेट क्लब, पांजरी मोहल्ल यांच्या वतीने आयोजित ‘आमदार चषक २०२६’ (सीझन-५) या भव्य क्रिकेट स्पर्धेला आजपासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेच्या यशस्वी नियोजनासाठी नगरसेवक सुहेल साखरकर,नगरसेवका आफ्रिन होडेकर आणि दिलदार क्रिकेट क्लबचे सर्व कार्यकर्ते मोठ्या जिद्दीने कष्ट घेत आहेत.
दिग्गजांची उपस्थिती आणि वेळ:
या स्पर्धेला राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री ना. उदयजी सामंत आणि आमदार किरणजी सामंत यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. मिरकरवाडा येथील ग्रीन पार्क ग्राउंड वर ही स्पर्धा पार पडणार असून, सायंकाळी ७:३० वाजल्यापासून क्रिकेट शौकिनांना या खेळाचा थरार अनुभवता येईल.
समालोचन आणि सोशल मीडिया कव्हरेज:
मैदानातील प्रत्येक चेंडूचा थरार प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रसिद्ध समालोचक राहीद सोलकर आणि चिन्मय साखरकर आपल्या दर्जेदार समालोचनाने रंगत वाढवणार आहेत. तसेच, घराघरातील प्रेक्षकांसाठी शब्बीर वस्ता आणि शौकत नावडे यांच्या माध्यमातून YouTube, Facebook आणि Instagram वर या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे.
स्थानिक कार्यकर्त्यांच्या मेहनतीने आणि मान्यवरांच्या उपस्थितीत रंगणाऱ्या या क्रिकेट उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन दिलदार क्रिकेट क्लबच्या वतीने करण्यात आले आहे.
आज मिरकरवाडा येथे ‘आमदार चषक २०२६’ चा दिमाखदार सोहळा संपन्न होणार; क्रिकेटच्या महासंग्रामासाठी कार्यकर्ते सज्ज!
Leave a Comment
