कोकण रेल्वे प्रशासनाकडून (केआरसीएल) कडून एप्रिल २०२६महिन्यात राबविण्यात आलेल्या विशेष तिकीट तपासणी मोहिमेत ३७ हजारांहून अधिक विनातिकीट तसेच अनियमित प्रवासी आढळूनआले. या मोहिमेदरम्यान प्रवाशांकडून दंड आणि थकीत भाड्याच्या स्वरूपात तब्बल ₹२.९० कोटींची वसुली करण्यात आली.कोकण रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहिती नुसार, एप्रिल महिन्यात एकूण ९३४ विशेष तपासणी मोहिमा राबविण्यात आल्या. या मध्ये विना तिकीट प्रवास, चुकीच्या श्रेणीतील प्रवास तसेच अनियमित तिकिटांच्या प्रकरणांवर कारवाई करण्यात आली.तसेच, २०२५-२६ या आर्थिक वर्षात कोकण रेल्वेकडून ११,३९४ विशेष तपासणी मोहिमा राबविण्यात आल्या असून, त्यामध्ये ४ लाख९९ हजार ६७५ अनधिकृत अथवा अनियमित प्रवाशांची प्रकरणे समोर आली आहेत. या कारवाईतून रेल्वेला एकूण ₹२७.६८ कोटींचा महसूल दंड व थकीत भाड्याच्या माध्यमातून प्राप्त झाला आहे.दरम्यान, उन्हाळी सुट्ट्यांमुळे वाढणारी प्रवासी गर्दी लक्षात घेता,कोकण रेल्वेने वैध तिकीटासह प्रवास करण्याचे आवाहन केले आहे.प्रवाशांना सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळावायासाठी Railway Protection Force (RPF) आणि रेल्वे अधिकाऱ्यांच्या समन्वयाने संपूर्ण मार्गावर तिकीट तपासणी मोहीम अधिक कडक करण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले.
तिकीट नसेल तर सावधान! तिकीट तपासणी मोहीम आणखी कडक होणार
Leave a Comment
