तिन्ही बक्षिसांवर अझीझा दाऊद नाईक हायस्कूलचे वर्चस्व; कु. अनामी अल्ताफ हिने पटकावला प्रथम क्रमांक
रत्नागिरी (प्रतिनिधी):
रत्नागिरी नगर परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘लोकमान्य टिळक जयंती आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा २०२६’ मध्ये अझीझा दाऊद नाईक हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करत शाळेच्या नांव उज्वल केला आहे. या स्पर्धेतील सर्वच्या सर्व तिन्ही प्रमुख बक्षिसे अझीझा दाऊद नाईक हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी पटकावून एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे.
स्पर्धेचा सविस्तर निकाल खालीलप्रमाणे आहे:
*प्रथम क्रमांक: कु. होडेकर अनम अल्ताफ (इयत्ता १० वी)
*द्वितीय क्रमांक (संयुक्त): कु. झैनब मुनाफ गुहागरकर (इयत्ता १० वी) आणि कु. हफ्सा सिद्दीक हाकीम (इयत्ता ९ वी)
यशस्वी ठरलेल्या सर्व विद्यार्थ्यांना शनिवार, दिनांक १ ऑगस्ट २०२६ रोजी रत्नागिरी नगर परिषदेच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या विशेष बक्षीस वितरण सोहळ्यात रोख रक्कम आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे.
शाळेमध्ये आनंदाचे वातावरण व कौतुकाचा वर्षाव:
विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल IEWS मॅनेजिंग कमिटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी, सर्व सदस्य, शाळा समितीच्या अध्यक्षा व सदस्या तसेच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने मुख्याध्यापक श्री. समीर एच. गडबडे यांनी विजयी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे. तसेच, विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करणाऱ्या समाजशास्त्र विभागाच्या प्रमुख सौ. झैबा आय. भट्टीवाले आणि त्यांच्या विभागातील सर्व शिक्षक-शिक्षकेतरांचे त्यांनी विशेष कौतुक केले आहे.



