सलग पाच वेळा राज्यस्तरीय ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स’ किताब पटकावत देशाचे नाव उज्ज्वल
मुंबई (विशेष प्रतिनिधी):
शैक्षणिक आणि बौद्धिक क्षेत्रात सेंट वेल्फ्रेड्स स्कूल,पनवेलच्या चिमुकल्यांनी पुन्हा एकदा जिल्ह्याचे आणि देशाचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर उंचावले आहे. पनवेलचा सुपुत्र आणि मूळचा रत्नागिरीचा असलेला अयान आसिफ सोलकर याने ‘इंटरनॅशनल अबॅकस ऑलिम्पियाड २०२६’ मध्ये यश संपादन करत “चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स” हा अत्यंत मानकरी किताब पटकावला आहे. अयानचे आजोबा फणसोप रत्नागिरीचे प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते मजीद भाई भाटकर हे आहेत.
अयान सोलकरने २०२२ ते २०२६ या कालावधीत सलग पाच वेळा राज्यस्तरीय अबॅकस व मानसिक गणित स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून आपल्या अफाट बुद्धिमत्तेची आणि सातत्याची चुणूक दाखवली आहे.
विविध ऑलिम्पियाडमध्ये नेत्रदीपक यश:
फक्त अबॅकसच नव्हे, तर शालेय शिक्षणासोबतच अयानने विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाडमध्ये आपल्या बुद्धिमत्तेची चमक दाखवली आहे. एस.ओ.एफ. इंटरनॅशनल मॅथेमॅटिक्स ऑलिम्पियाडमध्ये सुवर्णपदक, तसेच इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि सिलव्हरझोन ऑलिम्पियाडमध्येही त्याने उल्लेखनीय यश मिळवले आहे.
एमपीएससी परीक्षेतही बुद्धीचे वर्चस्व:
केवळ गणित आणि ऑलिम्पियाडच नव्हे, तर शैक्षणिक स्पर्धा परीक्षांमध्येही अयान सोलकरने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. त्याने नुकत्याच पार पडलेल्या स्पर्धा परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवत शैक्षणिक क्षेत्रातही आपल्या बुद्धिमत्तेची पताका फडकवली आहे.
वयाच्या चौथ्या इयत्तेत ही मोठी भरारी:
अयान सोलकर सध्या इयत्ता चौथीमध्ये शिक्षण घेत आहे. वयाच्या अवघ्या ९व्या-१०व्या वर्षी त्याने मिळवलेले हे यश थक्क करणारे आहे. या यशामागे त्याची सातत्यपूर्ण मेहनत, खडतर जिद्द, शिस्त आणि त्याचे पालक तसेच शिक्षकांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले आहे. त्याच्या या उज्ज्वल यशाबद्दल पनवेल आणि रत्नागिरीसह सर्वच स्तरातून अयानवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

