मुंबई:
कडाक्याच्या उन्हाने हैराण झालेल्या नागरिकांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि मोठी बातमी समोर येत आहे. यंदा मोसमी पाऊस वेळेपूर्वीच दाखल होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) वर्तवला आहे.
अंदमानात आजच आगमन: दक्षिण बंगालच्या उपसागरात मान्सूनसाठी अनुकूल वातावरण तयार झाले असून, आज (शनिवारी) अंदमान समुद्र आणि निकोबार बेटांवर पाऊस दाखल होईल. मुख्य भूमीवर म्हणजेच केरळमध्ये २६ मे रोजी मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. (यात ४ दिवस पुढे-मागे होऊ शकतात).
सर्वसाधारणपणे केरळनंतर १० ते १२ दिवसांनी पाऊस महाराष्ट्रात येतो. मात्र, हवामान अनुकूल राहिल्यास जूनच्या पहिल्याच आठवड्यात महाराष्ट्राच्या दक्षिण किनारपट्टीवर (कोकणात) पाऊस दाखल होऊ शकतो. सध्या सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील काही भागांत पूर्व-मौसमी पावसाची नोंद होत आहे. कमाल तापमानात घट झाली असली तरी दमट वातावरणामुळे उकाडा कायम आहे.
२६ मे रोजी केरळमध्ये तर जूनच्या पहिल्या आठवड्यात कोकणात आगमनाची शक्यता!
Leave a Comment
