रत्नागिरी:
कोकणची राजधानी असलेल्या रत्नागिरी शहरात सध्या गॅसचा भीषण तुटवडा निर्माण झाला असून, परिस्थिती हाताबाहेर जाताना दिसत आहे. आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीचा थेट फटका आता रत्नागिरीकरांच्या स्वयंपाकघराला बसू लागला आहे.
शहरातील गॅस एजन्सीबाहेर पहाटे ५ वाजल्यापासून नागरिकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. केवळ घरगुती ग्राहकच नव्हे, तर व्यावसायिक सिलिंडरचा पुरवठाही विस्कळीत झाल्याने शहरातील हॉटेल व्यवसाय पूर्णपणे बंद होण्याच्या मार्गावर आहे. विशेषतः हातावर पोट असणारे वडापाव आणि भजी विक्रेते हवालदिल झाले असून, गॅसअभावी त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. प्रशासनाने यावर तातडीने तोडगा न काढल्यास शहरात मोठी खळबळ उडण्याची शक्यता आहे.
रत्नागिरीत गॅसचा ‘हंबरडा’! पहाटे ५ पासून रांगा, हॉटेल व्यवसाय कोलमडला; सर्वसामान्यांच्या चुली विझणार?
Leave a Comment
