“मोठे मोठे गार केले गंमतमध्ये…!” उदय सामंतांच्या सूचक व्हॉट्सॲप स्टेटसमुळे राजकीय वर्तुळात खळबळ; ‘ऑपरेशन टायगर’वरून चर्चांना उधाण

Shabbir Vasta
1 Min Read

मुंबई:
राजकीय भूकंप आणि अनपेक्षित घडामोडींसाठी ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पुन्हा एकदा वादळ येण्याची चिन्हं आहेत. राज्याचे उद्योगमंत्री आणि शिवसेना (शिंदे गट) नेते उदय सामंत यांनी आपल्या व्हॉट्सॲपवर ठेवलेल्या एका सूचक स्टेटसने सध्या संपूर्ण महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणात खळबळ उडवून दिली आहे. “मोठे मोठे गार केले गंमतमध्ये…!” अशा आशयाचे हे स्टेटस सोशल मीडियावर वाऱ्यासारखे व्हायरल झाले असून, या साध्या वाटणाऱ्या ओळींमागे एक मोठा राजकीय स्फोट दडला असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
नेमकं काय आहे व्हॉट्सॲप स्टेटस?
उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आपल्या व्हॉट्सॲप स्टेटसवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एक हसरा फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत “मोठे मोठे गार केले गंमतमध्ये…” हा प्रसिद्ध गाण्याचा डायलॉग जोडण्यात आला आहे. हे स्टेटस समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात, विशेषतः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) गटात मोठी अस्वस्थता पसरल्याचे बोलले जात आहे.
ठाकरे गटाच्या ६ खासदारांशी थेट संबंध?
या सूचक स्टेटसचा थेट संबंध ‘उबाठा’ गटाच्या खासदारांशी जोडला जात आहे. राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चांनुसार, ‘ऑपरेशन टायगर’ अंतर्गत ठाकरे गटाचे तब्बल ६ खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याची जोरदार चर्चा आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *