रत्नागिरी:
राज्यात पावसाने ओढ दिल्यामुळे बळीराजासह सर्वच नागरिक चिंतेत आहेत. याच पार्श्वभूमीवर, चांगल्या पावसासाठी आणि अस्मानी संकटांपासून मुक्ती मिळवण्यासाठी रत्नागिरीत आज विशेष सामूहिक प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘जमियत उलेमा-ए-हिंद, रत्नागिरी’तर्फे आज, शुक्रवार दिनांक १९ जून २०२६ रोजी ‘नमाज-ए-इस्तिस्का’ (पावसासाठीची विशेष नमाज) पठण केली जाणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी येथील राज नगर मरकझ ग्राउंड येथे आज संध्याकाळी ठीक ५:०० वाजता (असरच्या नमाज नंतर) हा सामूहिक प्रार्थना सोहळा पार पडणार आहे. जमियत उलेमा-ए-हिंद रत्नागिरीचे अध्यक्ष (सदर) मौलाना जुबेर नकाडे यांनी यासंबंधीची माहिती दिली आहे.
नागरिकांसाठी महत्त्वाच्या सूचना:
आयोजकांतर्फे या नमाजसाठी येणाऱ्या नागरिकांना काही महत्त्वाच्या सूचना करण्यात आल्या आहेत:
* सर्व नागरिकांनी घरूनच वजू (शुद्धीकरण) करून यावे.
* प्रत्येकाने येताना स्वतःची मुसल्ला (जाहनमाज/चटई) सोबत घेऊन यावी.
* जास्तीत जास्त ‘इस्तिगफार’ (क्षमाप्रार्थना) करावी.
* येताना आपल्यासोबत ‘सदका’ (दान) घेऊन यावे.
“अल्लाहने सर्वांवर आपली रहमत आणि कृपादृष्टी ठेवावी, चांगला पाऊस पडू द्यावा आणि सर्व प्रकारच्या संकटांपासून व नुकसानापासून सर्वांचे रक्षण करावे,” अशी प्रार्थना याद्वारे केली जाणार आहे. या विशेष प्रार्थनेसाठी मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मौलाना जुबेर नकाडे (+91 92267 11711) यांनी केले आहे.
रत्नागिरीत पावसासाठी आज ‘नमाज-ए-इस्तिस्का’ पठण; जमियत उलेमा-ए-हिंदचे आवाहन
Leave a Comment
