रत्नागिरी: १० वी आणि १२ वीचे निकाल नुकतेच जाहीर झाले असून, आता सर्वत्र विद्यार्थ्यांची पुढील प्रवेशासाठी (Admission Process) धावपळ सुरू झाली आहे. मात्र, कॉलेज प्रवेशाच्या वेळी लागणाऱ्या विविध शासकीय दाखल्यांमुळे (Certificates) विद्यार्थ्यांना आणि पालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. हीच अडचण ओळखून ‘अपूर्व किरण सामंत फाउंडेशन’च्या वतीने एक स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे. पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी फाउंडेशनने संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ‘तालुकावार हेल्पलाईन नंबर’ जाहीर केले आहेत.
प्रवेश प्रक्रियेत किंवा दाखल्यांबाबत कोणतीही अडचण किंवा शंका असल्यास खालील तालुका प्रतिनिधींशी संपर्क साधण्याचे आवाहन फाउंडेशनतर्फे करण्यात आले आहे.
रत्नागिरीतुषार साळवी 7517411111
चिपळूणनिहार कोवळे 83086 02317
संगमेश्वरप्रसाद अपणकर 9850088208
गुहागरप्रणव पोळेकर 8208824959
राजापूरप्रसन्न मालपेकर 9405691533
लांजाप्रसाद भाईशेट्ये 9405470920

