रत्नागिरी : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या २८ व्या वर्धापन दिनानिमित्त लोवले-संगमेश्वर येथील नवनिर्माण कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करून हा दिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला
कार्यक्रमाच्या प्रारंभी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या स्थापनेचा इतिहास, आरोग्य शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यापीठाने केलेल्या कार्याचा आढावा घेण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना आरोग्य सेवेत गुणवत्ता, संशोधन आणि सामाजिक बांधिलकी यांचे महत्त्व पटवून देण्यात आले.महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. प्रज्ञा कदम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विद्यापीठाच्या प्रगतीचा गौरव केला.आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट सेवा देण्यासाठी विद्यार्थ्यांनी सतत ज्ञानवृद्धी, कौशल्य विकास आणि व्यावसायिक मूल्ये जोपासण्यावर भर द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमास प्राध्यापक अमृता पाल्ये, स्नेहल विंचू, नेहा सरवणकर, अंजली माने, साक्षी जाधव, रोशनी तोडकरी, ओंकार जाधव, योगेश सरकटे तसेच दीपक भोसले यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.वर्धापन दिनानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.
नवनिर्माण कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा वर्धापन दिन उत्साहात साजरा
Leave a Comment
