राजापूर (नाणार इंगळवाडी):
राजापूर तालुक्यातील नाणार इंगळवाडी येथे रविवारी दुपारच्या सुमारास एक अत्यंत हृदयद्रावक आणि काळीज पिळवटून टाकणारी दुर्घटना घडली. खाडीपात्रात कालवे काढण्यासाठी आई-वडिलांसमवेत गेलेल्या एकाच कुटुंबातील पाच भावंडांपैकी चार मुलांचा खोल पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेमुळे संपूर्ण राजापूर तालुक्यासह नाणार पंचक्रोशीत तीव्र शोककळा पसरली आहे.
काय घडली घटना?
प्राप्त माहितीनुसार, नाणार इंगळवाडी येथील भाटकर कुटुंबातील मुले आपल्या आई-वडिलांसोबत रविवारी खाडी परिसrात गेली होती. यादरम्यान पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने दुर्घटनेत एकाच कुटुंबातील चार चिमुकले पाण्यात बुडाले. या भीषण घटनेत एका मुलीला सुदैवाने वाचवण्यात यश आले असले, तरी इतर चार मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.
मृत मुलांची नावे आणि वये:
या दुर्घटनेत प्राण गमावलेल्या भावंडांचे विवरण खालीलप्रमाणे आहे:
* मोहम्मद जुनेद भाटकर (वय ६ वर्षे)
* जुहेरिया जुनेद भाटकर (वय ९ वर्षे)
* बुशिरा जुनेद भाटकर (वय ११ वर्षे)
* माहिरा जुनेद भाटकर (वय १५ वर्षे)
घटनास्थळी नागरिकांची आणि पोलिसांची गर्दी
घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी आणि ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. घटनेची गंभीर दखल घेत पोलीस व प्रशासन यंत्रणा तसेच स्थानिक नागरिकांच्या मदतीने पाण्यात बुडालेल्या मुलांचा शोध घेण्यात आला. या दुर्दैवी घटनेमुळे भाटकर कुटुंबावर व संपूर्ण गावावर मोठा आघात झाला असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
राजापूरमध्ये मन हेलावणारी दुर्घटना; खाडीत बुडून एकाच कुटुंबातील चार चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत
Leave a Comment
