खुप अभ्यास करा..मनसोक्त खेळा आणि आपले कलागुण जोपासा…
मा.शिक्षणमंत्री दादासाहेब भुसे यांनी विद्यार्थ्यांना दिला कानमंत्र…

Shabbir Vasta
3 Min Read

चला शाळेत जाऊ या , या कार्यक्रमांतर्गत सावर्डे केंद्रात शिक्षण मंत्री महोदयांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा , शिक्षकांचा तसेच अधिकाऱ्यांचा सन्मान

रत्नागिरी : या अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री नामदार दादासाहेब भुसे साहेब यांनी रत्नागिरी दौऱ्यादरम्यान चिपळूण येथील जि.प.पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा कोंडमळा नं.1 या शाळेला भेट दिली असता विद्यार्थांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते..
सुरूवातीला प्रसिद्ध अभिनेते आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते नाना पाटेकर यांचे दु:खद निधन झाल्याने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये गुणवत्ता यादीत आलेल्या तसेच कला व क्रीडा नैपुण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला .यामध्ये मांडकी खुर्द शाळेतील दुर्गा अनंत शिगवण आणि पुर्वी अजय मादगे  ( इ.7वी)  तसेच कुशिवडे शिगवणवाडी शाळेतील वेदिका दिनेश वणगे ( इ.4थी) त्यांच्याबरोबर कोंडमळा शाळेतील स्वरा विजय घाणेकर (गायन) आणि आर्या अंकुश राडे (क्रीडा नैपुण्य)या विद्यार्थिनींचा समावेश होता.
त्यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याऱ्या गुरूजींचा देखील सन्मान करण्यात आला त्यामध्ये मांडकी खुर्दचे रविंद्र घाणेकर, कुशिवडे शिगवणवाडी शाळेचे मुख्याध्यापक प्रविण शिवडे आणि सतिश सावर्डेकर यांचा सत्कार मा.शिक्षण मंत्री  नामदार दादासाहेब भुसे साहेब हस्ते करण्यात आला.
विद्यार्थ्यांना संबोधित करताना मा.मंत्री महोदयांनी खुप अभ्यास करा..खुप मेहनत करा…खुप खेळा त्याचबरोबर आपले कलागुण जोपासा असे मार्गदर्शन केले. शालेय परिसराची पाहणी करताना शालेय परसबाग पाहून मंत्री महोदयांनी समाधान व्यक्त केले.शाळेतील विविध उपक्रमांची व योजनांची माहिती घेतली.त्याचप्रमाणे शाळेच्या भौतिक सुविधांचा आढावा घेतला.परिपूर्ण भौतिक सुविधा, सुंदर शालेय परिसर, बोलक्या भिंती, उपक्रमशील , आनंददायी शाळा, क्रीडा नैपुण्य आणि स्पर्धा परीक्षेतील यशस्वीता , शाळेच्या यशस्वी वाटचालीत शाळा व्यवस्थापन समितीचे सहकार्य या सर्व बाबींचे कौतुक केले.विद्यार्थ्यासोबत मुक्त संवाद साधत विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेची पडताळणीही केली. विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास पाहून शिक्षकांचे कौतक केले.त्यानंतर  मा.दादासाहेब भुसे यांनी शाळेच्या प्रांगणात सर्व अधिकारी  विद्यार्थी, पालक ,ग्रामस्थ यांच्या सोबत हितगुज करून फोटो सेशन केले.
यावेळी त्यांच्यासोबत जि.प.शिक्षण समितीचे सभापती मा.नंदकुमार मुरकर साहेब, शिक्षणाधिकारी योजना मा श्री किरण लोहार साहेब, माध्यमिक शिक्षणाधिकारी मा.श्री.दिपक मेंगाणे साहेब, उपशिक्षणाधिकारी मा.श्री.संदेश कडव साहेब,तसेच जि.प.सदस्या सौ.पूजाताई निकम मॅडम ,पंचायत समितीचे सदस्य शौकत माखजनकर सर , चिपळूणचे गटशिक्षणाधिकारी मा.श्री.दादासाहेब इरनक साहेब , सावर्डे प्रभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी मा.श्री.राजअहमद देसाई साहेब, चिपळूण प्रभागाच्या शिक्षण विस्तार अधिकार मा.अस्माकौसर देसाई मॅडम, केंद्रसमन्वयक श्रीम.गावडे मॅडम, शाळा व्यवस्थापन समिती कोंडमळा नं.1 चे अध्यक्ष विनोद घाणेकर, शिक्षण तज्ञ्ज दिनेश विचारे,माजी सरपंच संतोष राडे,त्याबरोबर मांडकी खुर्द चे शाळा व्यवस्थापन समितीचे शिक्षण तज्ज्ञ श्रीराम घाणेकर तसेच कोंडमळा नं.1 मुख्याध्यापक संतोष कदम,शिक्षक , ग्रामस्थ व पालक उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन आणि आभार प्रदर्शन संदेश सावंत यांनी केले.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *