आयडियल एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीच्या नवनिर्वाचित व्यवस्थापन समितीची पहिली बैठक उत्साहात संपन्न

Shabbir Vasta
2 Min Read

‘स्टार न्यूज़ कोकण’
संपादक : शब्बीर वस्ता

रत्नागिरी:आयडियल एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी (IEWS) च्या नवनिर्वाचित व्यवस्थापन समितीची पहिली बैठक अझिझा दाऊद नाईक हायस्कूल, रत्नागिरी येथे अत्यंत उत्साहपूर्ण आणि आनंददायी वातावरणात पार पडली.बैठकीच्या प्रारंभी संस्थेचे कायम विश्वस्त आणि नवनिर्वाचित अध्यक्ष श्री. खलील एस. एच. नाईक यांनी उपस्थितांचे स्वागत केले. संस्थेच्या ५९ वर्षांच्या समृद्ध प्रवासाचा आढावा घेत त्यांनी पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या योगदानाचे कौतुक केले. त्यांच्या अथक परिश्रमामुळेच ही संस्था कोकणातील सर्वात मोठ्या उर्दू-सेमी इंग्लिश शैक्षणिक संस्थांपैकी एक म्हणून नावारूपाला आली असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी कै. श्री. इस्माईल हकीम, कै. एम. डी. नाईक, कै. शेख हसन नाईक आणि कै. श्री. रफिक नाईक यांच्यासारख्या माजी अध्यक्षांच्या व सहकाऱ्यांच्या योगदानाचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला.अध्यक्षांनी नवनिर्वाचित व्यवस्थापन समितीची घोषणा करून सदस्यांचे स्वागत केले. संस्थेच्या डायमंड ज्युबिली वर्षात सर्वांनी संस्थेला २१ व्या शतकातील आधुनिक व आदर्श शैक्षणिक संस्था बनवण्यासाठी एकत्र काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.

नवनिर्वाचित व्यवस्थापन समिती:

श्री. नाझीर नाईक, श्री. अश्रफ नाईक, डॉ. अम्बरीन नाईक, सौ. रुबिना नाईक, कु. मिस्बा नाईक, सौ. यास्मीन नाईक, श्री. मुनीर शेख, श्री. मुदस्सर मुकादम, श्री. तनवीर काझी, सौ. खदीजा प्रधान आणि श्री. उझैफ वाघू.या बैठकीला इस्माईल हकीम प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मुरिदा काझी आणि अझिझा दाऊद नाईक हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. समीर गडबडे उपस्थित होते. डॉ. अम्बरीन नाईक, सौ. रुबिना नाईक व श्री. झहूर हकीम यांना अनुपस्थितीची परवानगी देण्यात आली होती.संस्थेचे कामकाज सुरळीत चालण्यासाठी सर्व सदस्यांना जबाबदाऱ्यांचे वाटप करण्यात आले. श्री. मुनीर शेख यांनी संस्थेच्या परंपरेचा आढावा घेत नवीन समिती यशाची नवी शिखरे गाठेल असा विश्वास व्यक्त केला. बैठकीचे सूत्रसंचालन जनरल सेक्रेटरी श्री. मुदस्सर मुकादम यांनी केले, तर श्री. तनवीर काझी यांनी आभार मानले.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *