३० वर्षांची अतूट मैत्री आणि जनतेच्या हाकेला धावणारे संवेदनशील नेतृत्व: धडाडीचे पंचायत समिती सदस्य श्री. नेताजी पाटील!
आमचे परममित्र, मार्गदर्शक व धडाडीचे पंचायत समिती सदस्य श्री. नेताजी पाटील (मार्गदर्शक व मंत्री महोदय उदय सामंत यांचे पी.ए) यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!
काही नाती रक्ताची नसतात, पण ती रक्ताच्या नात्यापेक्षाही कितीतरी पटीने घट्ट आणि अनमोल असतात. गेली ३० वर्षे ज्यांच्यासोबत निखळ, प्रामाणिक आणि जीवाभावाची मैत्री निभावत आलो, असे आमचे लाडके मित्र म्हणजे नेताजी पाटील. मैत्री म्हणजे काय, विश्वास म्हणजे काय आणि शब्दाला जागणं काय असतं, याचं उत्तम उदाहरण म्हणजे त्यांचं व्यक्तिमत्त्व.
आज ते मंत्री महोदय उदय सामंत यांचे पीए म्हणून जबाबदारी सांभाळत असले, तरी त्यांच्यातला साधेपणा आणि आपुलकी आजही तशीच आहे. पद आणि प्रतिष्ठा माणसाला बदलते असं म्हणतात, पण नेताजींनी नेहमी माणसांना जोडण्याला प्राधान्य दिलं. कधीही फोन लावला की पहिल्याच रिंगवर हसतमुखाने उचलणारा आवाज म्हणजे आमचे नेताजी! कधी कामात व्यस्त असले आणि फोन उचलता आला नाही, तरी समोरचा व्यक्ती कोण आहे याचा विचार न करता, सुटलेला प्रत्येक कॉल पाहून स्वतःहून समोरून फोन करून “बोला, काय काम होतं?” असं विचारणारा संवेदनशील माणूस आजच्या काळात शोधूनही सापडणार नाही.
गरिबांची अडचण असो, एखाद्या सर्वसामान्याचं अडलेलं काम असो, लहान असो वा मोठा समोरचा माणूस कोणत्या पदावर आहे हे न पाहता प्रत्येकाच्या हाकेला धावून जाणे आणि प्रत्येकाचं काम आपलं समजून मार्गी लावणे, हा त्यांचा स्वभाव आहे. जनसेवेचा हा वसा आणि माणसांवरचं निस्वार्थ प्रेम त्यांना लोकांच्या गळ्यातला ताईत बनवून गेलं आहे.
गेल्या ३० वर्षांच्या आमच्या या मैत्रीच्या प्रवासात अनेक चढ-उतार पाहिले, पण नेताजींची मैत्री नेहमी सावलीसारखी सोबत राहिली. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो की, त्यांना उदंड आणि निरोगी दीर्घायुष्य लाभो, त्यांची जनसेवेची ही अखंड ऊर्जा अशीच कायम राहो आणि त्यांना जीवनात उत्तुंग यश मिळो!
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा, मित्रा!
शब्बीर वस्ता
(संपादक स्टार न्युज कोकण)
