दु:खद वार्ता: रत्नागिरीतील मिरकरवाडा येथील सादिक भाई यांचे कोल्हापूर येथे निधन

Shabbir Vasta
1 Min Read

रत्नागिरी:
मिरकरवाडा येथील रहिवासी आणि एक परिचित व्यक्तिमत्व सादिक भाई यांचे रविवारी कोल्हापूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना दुःखद निधन झाले. त्यांच्या जाण्याने मिरकरवाडा परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर कोल्हापूर येथे उपचार सुरू होते. मात्र, रविवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सादिक भाई हे आपल्या मनमिळाऊ स्वभावासाठी ओळखले जात असत. त्यांच्या निधनाने त्यांच्या परिवारावर आणि मित्रपरिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

सादिक भाई यांच्या जनाजाची नमाज आज, सोमवार सकाळी ११:३० वाजता खडप मोहल्ला येथील मस्जिद-ए-यूनुस येथे पार पडणार आहे. त्यानंतर स्थानिक दफनभूमीत त्यांना सुपूर्द-ए-खाक केले जाईल.
    अल्लाह ताला त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि त्यांच्या परिवाराला हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, हीच प्रार्थना.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *