बंगळुरू : टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 161 धावांचं आव्हान दिलं होतं.ऑस्ट्रेलियाकडून बेन मॅकडरमॉट याने सर्वाधिक 54 धावांची खेळी केली. ट्रेव्हिस हेड याने 28 धावांचं योगदान दिलं.टीम डेव्हिड याने 17 आणि मॅथ्यु शॉर्ट याने 16 धावा जोडल्या. आरोन हार्डी याने 6 तर जोश फिलीपी 4 धावा करुन माघारी परतला. बेन ड्वार्शुइस आला तसाच झिरोवर परत करत गेला. टीम इंडियाकडून मुकेश कुमार याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर रवी बिश्नोई याने 2 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. अक्षर पटेल आणि अर्शदीप सिंह या दोघांनी 1-1 विकेट घेतली.
दरम्यान त्याआधी ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून टीम इंडियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं. टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 160 धावा केल्या. टीम इंडियाडकडून यशस्वी जयस्वाल आणि ऋतुराज गायकवाड या सलामी जोडीने अनुक्रमे 21 आणि 10 धावा केल्या. श्रेयस अय्यर याने टीम इंडियासाठी सर्वाधिक धावा केल्या. श्रेयसने 37 बॉलमध्ये 5 फोर आणि 2 सिक्सच्या मदतीने 53 रन्स केल्या. कॅप्टन सूर्यकुमार यादव 5 आणि रिंकू सिंह 6 रन्स करुन तंबूत परतले. विकेटकीपर जितेश शर्मा याने 24 आणि अक्षर पटेल याने 31 धावा केल्या. तर रवी बिश्नोई आणि अर्शदीप सिंह या दोघांनी 2-2 धावा जोडल्या.