आपल्या आजारपणावर मात करत डॉ. सचिन पानवलकरांनी जिकूंन दाखवलंच!!!
रत्नागिरी : तुम्ही या पुढे तुमचा आवडता बॅडमिंटन खेळ खेळू शकत नाही. असं उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलेले असताना ही आपल्या जिद्दी च्या जोरावर डॉक्टर सचिन पानवलकर यांनी राष्ट्रीय स्तरावर जिकूंन दाखवलंच “!!
आज डॉक्टर पानवलकराच्या तीन पिढ्या बॅडमिंटन या खेळात अगदी विविध पारितोषिक विजेते आहेत.देशात पहिलीच नुकतीच पुणे येथील बालेवाडी मध्ये देशातील डॉक्टर्स ची बॅडमिंटन स्पर्धा झाली होती. या स्पर्धेत देशातील विविध राज्यातील अगदी नावाजलेले बॅडमिंटन खेळाडू आले होते.
इंडियन डॉक्टर्स ऑलिम्पिक्स (IDO) मध्ये बॅडमिंटन मध्ये डॉ . सचिन पानवलकर व डॉ. निनाद लुब्री डबल्स मध्ये विजयी झाले. या स्पर्धा प्रथमच पुणे येथे बालेवाडी येथील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्टेडियम मध्ये खेळवण्यात आल्या होत्या. या स्पर्धेसाठी संपूर्ण भारतातून महाराष्ट्र, गोवा, केरळ, कर्नाटक, वेस्ट बंगाल, तामिळनाडू, ओडिसा इत्यादी अनेक राज्यातून 350 हुन अधिक खेळाडूंनी भाग घेतला होता.
यापूर्वीही डॉ. सचिन पानवलकर यांनी वर्ल्ड मास्टर्स टूर्नामेंट या आंतरराष्ट्रीय स्पर्धेतही गोल्ड मेडल मिळवली आहेत. डॉ. निनाद लुब्री यांनीही महाराष्ट्र डॉक्टर्स टूर्नामेंट तसेच जिल्हास्तरीय स्पर्धामध्ये विजय मिळवला आहे. या स्पर्धेची ट्रॉफी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे Olympiyan निखिल कानिटकर यांच्या हस्ते देण्यात आली.
इंडियन डॉक्टर्स ऑलिम्पिकस मध्ये क्रिकेट, टेबल टेनिस, lawn टेनिस, स्विमिन्ग इत्यादी खेळामधून सुमारे 1400 खेळाडूंनी भाग घेतला. ही स्पर्धा सिरम इन्स्टिटयूट नी स्पॉन्सर केली होती.