रत्नागिरी: माजी कसोटी पटू दिलीप वेंगसरकर यांनी दर्जेदार क्रिकेट पटू घडविण्या साठी स्थापन केलेल्या क्रिकेट ॲकॅडमीने आत्तापर्यंत महाराष्ट्रा साठी अनेक क्रिकेटपटू घडविले आहेत.या वर्षी पुणे येथे निरनिराळ्या वयो गटा साठी निवड चाचण्या आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यानुसार १२ वर्षा खालील वयो गटा साठी संपूर्ण महाराष्ट्रातून ९०० खेळाडू आले होते. परंतु कु. झिदान मंगा ची अंतिम १४ जणाच्या संघा मध्ये निवड केली.
पुणे मुंबईच्या व्हेराॅक क्रिकेट अकॅडमी निवड होणारा हा रत्नागिरीचा पहिलाच खेळाडू आहे. या पूर्वी देखील रत्नागिरीत असताना कै.छोटू देसाई क्रिकेट अकॅडमी च्या अंतर्गत स्पर्धेत दोन शतके हुकली होती. त्यावेळी अकॅडमीचे सचिव व प्रशिक्षक दीपक देसाई यांनी त्यांच्या पालकांना झिदान ला चांगला क्रिकेटपटू घडवायचा असेल तर त्याला मुंबई अथवा पुणे येथे पाठविण्याचे सूचित केले होते. त्यानुसार त्यांच्या पालकांनी त्याला पुणे येथे केवल क्रिकेट साठी प्रवेश घेतला आहे. सध्या झिदान मंगा या व्हेराॅक प्रमाणे पुणे येथील महाराष्ट्र रणजी संघाचे माजी कर्णधार श्री. मिलिंद गुंजाळ व भारताचे कसोटीपटू रोहित शर्मा व शार्दुल ठाकुर चे गुरु श्री दिनेश लाड यांचे कडून मार्गदर्शन मिलत आहे. झिदान मंगा च्या निवडी बद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.