रत्नागिरी : मिरकरवाडा येथे बकरी ईद च्या पार्श्वभूमी नुसार रत्नागिरी शहर पोलीस निरीक्षक शिरीष सासने यांनी मिरकरवाड्यातील सर्व मोहल्ल्यातील पुढार्यांची बैठक घेऊन ईद निमित्त शांतता राखण्या बाबतीत मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी प्रत्येक मशीदी मध्ये सी.सी टीव्ही लावण्यासाठी विनंती केली . त्यातील एक कॅमेरा बाहेर लावावा तो कॅमेरा पोलीस ठाण्यात टॅग केला जाईल म्हणजे मोहल्ल्यात येणार्या चोरट्यांवर वर लक्ष ठेवण्यात येईल. ज्या मशीदी मध्ये सी सी टीव्ही असतील त्यांनी सहकार्य करावे असे ते म्हणाले. खलाश्यां (मच्छीमारी बोटी वरील कामगार) बाबतीत म्हणाले की प्रत्येक खलाश्यां ची विशेषतः नेपाली खलाश्यां ची ओळखपत्रे आवश्य घ्यावी.मुलींच्या शिक्षणा बाबतीत म्हणाले की आपापल्या मुलींना उच्च शिक्षण द्या व लग्ना पूर्वी त्यांना नोकरीला लावा ते त्यांच्या भविष्यात फार उपयोगी पडेल.सासने साहेबांनी कोकणा ची व विशेषतः रत्नागिरीकरां ची भरपूर प्रशंसा केली. ते म्हणाले मी २००४ पासून येथे आहे मला येथे जातीय सलोखा दिसून आला.
या बैठकीला जमातुल मुस्लिमीन मिरकरवाडा चे अध्यक्ष हाजी इम्तीयाज शेट मुकादम, सचिव नजीरूद्दीन वस्ता,सहसचिव अ.करीम मज़गांवकर,मिरकरवाडा आदर्श मच्छिमार सोसायटी चे अध्यक्ष इम्रान मुकादम, माजी नगरसेवक नुरूद्दीन पटेल,यासीन साखरकर, मक्सूद सोलकर,शब्बीर राजपूरकर,अलाऊद्दीनजयगडकर, ताजुद्दीन होडेकर,सलाऊद्दीन सोलकर,इब्राहिम मस्तान,समीर महालदार,हुसेनमिया मस्तान,अलाऊद्दीन मज़गांवकर, रहीम अकबर अली,इक्बाल खान, मज़हर मुकादम, अस्लम फणसोपकर इत्यादी मान्यवर हजर होते.