रत्नागिरी; आमदार राजन साळवी रत्नागिरीत आले असता ते बोलत होते जे कोणी आता शिवसेना सोडून शिंदे गटात गेले आहेत त्यांना आम्ही जा असे म्हटले नव्हते. त्यांना स्वतः जाऊ असे वाटले म्हणून ते गेले आहेत. आता दिल्या घरी त्यांनी सुखी राहा असा आमदार राजन साळवी यांनी बंडखोर आमदाराला टोला लावला आहे.
महाराष्ट्रात एकनाथ शिंदे सरकार अस्तित्वात आले आहे. अजूनही शिंदे गटातील आमदार ज्यावेळी आपली भूमिका मांडत असतात त्या वेळी शिवसेना उत्तर देत असतो. शिंदे गटात कोकणातील ३ आमदार गेले आहेत. उदय सामंत व दीपक केसरकर हे तर राष्ट्रवादीतून शिवसेनात आले होते. शिवसेनेने त्यांना निवडून दिलेले आहे हे त्यांना व जनतेला ही माहित आहे. शिवसेनेला पुन्हा गतवैभव प्राप्त होईल. असा विश्वास आमदार राजन साळवी यांनी व्यक्त केला आहे.