मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईचे माजी रणजीपटू अनंत सोलकर यांचे रविवारी दिनांक १९ मे रोजी निधन झाले. जायबंदी झाल्या मुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
दिवंगत भारताचे माजी कर्णधार व माजी कसोटीपटू एकनाथ सोलकर यांचे ते लहान भाऊ होत. ते मुंबईतील क्रिकेट वर्तुळात ‘अन्या’ या नावाने प्रसिद्ध होते. रेल्वे तसेच महाराष्ट्र संघा कडून २६ सामने खेळलेल्या सोलकर यांनी २३.९६ च्या सरासरीने ६३ फलंदाज बाद केले तसेच एका अर्ध शतकासह ६२८ धावा केल्या होत्या. ते उपयुक्त ऑफस्पिनर तसेच फलंदाज होते. हॅरिस शील्ड स्पर्धेत मराठा हायस्कूल कडून खेळताना सोलकर यांनी ३९६ धावा करताना २८ धावांत सहा फलंदाज बाद केले होते. ही या स्पर्धेतील अद्यापही सर्वोत्तम अष्टपैलू कामगिरी आहे. ते हिंदू जिमखाना तसेच टाटा स्पोर्टस क्लब कडून खेळले होते.१९७२ मध्ये उत्तर विभागा कडून एमसीसी संघाविरुद्ध खेळताना त्यांना१६ षटकांत एकही विकेट घेता आली नव्हती, पण त्यांच्या गोलंदाजीवर चार झेल सुटले होते, अशी आठवण सांगितली जाते.
त्यांचा रत्नागिरी तालुक्यातील पावस या मूळ गांव आहे. अधुन मधुन ते आपल्या नातेवाईकांना व मित्र मंडळीना भेटायला रत्नागिरीत येत होते. स्टार न्यूज कोकण चे संपादक शब्बीर वस्ता व उपसंपादकय नजीरूद्दीन वस्ता यांच्याशी ही त्यांचे घनिष्ठ संबंध होते. दोन वर्षे पूर्वी कै.अनंत सोलकर जेंव्हा रत्नागिरीत आले होते तेंव्हा त्यांनी या दोन बंधूची त्यांच्या घरी येऊन भेट घेतली होती. त्याच प्रमाणे कै.अनंत सोलकर यांचे चिरंजीव क्रिकेट पंच (Umpire) कुणाल सोलकर पंधरा दिवसापूर्वी रत्नागिरीत आले होते. त्यावेळी वस्ता बंधूची त्यांच्या घरी जाऊन त्यांनीही भेट घेतली होती.
त्यांच्या निधनाने क्रिकेट जगतात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

कै.अनंत सोलकर