Saturday, April 19, 2025
HomeNewsअजिझा दाऊद नाईक हायस्कूलची उल्लेखनीय कामगिरी

अजिझा दाऊद नाईक हायस्कूलची उल्लेखनीय कामगिरी

चिपळूण :
सावर्डे येथे झालेल्या जिल्हास्तरीय भालाफेक स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी अजिझा दाऊद नाईक हायस्कूल रत्नागिरीने करून सुवर्ण व रौप्यपदक पटकावले.
शाळेचे क्रीडा शिक्षक मैनुद्दीन भैरेवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली मदिहा अल्ताफ बोरकर हिने सुवर्ण पदक व प्रमाणपत्र मिळवून प्रथम पारितोषिक पटकावले. तर उम्मे कुलसुम तबरेज सोलकर हिने रौप्य पदक व प्रमाणपत्र मिळवून द्वितीय पारितोषिक पटकावले.उत्कृष्ट भालाफेकपटू मदिहा अल्ताफ बोरकर आणि उम्मे कुलसुम तबरेझ सोलकर यांनी जिल्हा क्रीडा मैदान सावर्डे चिपळूण येथे झालेल्या जिल्हास्तरीय भालाफेक स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांचे सर्वांनी अभिनंदन केले.

RELATED ARTICLES

Most Popular