रत्नागिरी
रत्नागिरी शहरातील मारुतीमंदिर सर्कल येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या जवळील शिवसृष्टी मधील मावळ्यांची विटंबना करण्याचे काम काल रात्री काही समाजकंटकाकडून करण्यात आले आहे. आज मनसे पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी भेट देऊन सदर अप्रिय घटनेचा निषेद नोंदवला. तसेच निवडणुकीच्या तोंडावर राजकीय हेतूने अश्या प्रकारची घृणास्पद कृत्ये होतायत का ह्या बाबत सखोल तपास व्हावा अशी मागणी मनसे पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली.
ह्यावेळी रत्नागिरी मनसे चे शहर अध्यक्ष अद्वैत कुलकर्णी, शहर संघटक अमोल श्रीनाथ, उपशहर अध्यक्ष राजेश नंदाने, इम्रान नेवरेकर, विभाग अध्यक्ष सर्वेश जाधव, दत्तात्रय गुरव आदि महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.