रत्नागिरी :
जि. प.शाळा पूर्णगड नं.१ ता.जि. रत्नागिरी या शाळेत जागतिक महिला दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. प्रथमतः महिलांना मानवंदना देण्यासाठी ढोल ताशांच्या गजरात, लेझीमच्या ठेक्यावर रॅली काढण्यात आली. यावेळी विविध घोषणा देण्यात आल्या. तदनंतर दीप प्रज्वलन, सरस्वती पूजन, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. उपस्थित सर्व महिला भगिनींचे फेटा बांधून, पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. थोर महिलांच्या कार्याचा आढावा शिक्षकांनी कथन केला. महिला सक्षमीकरणासाठी शाळेतील विद्यार्थिनींनी उत्कृष्ट गीत गायन सादर केले. त्यानंतर महिलांसाठी विविध फनी गेम्सचे आयोजन करण्यात आले. यात महिलांनी सहभाग घेऊन, आनंद मिळवला. यातील विजेत्यांना बक्षीसेही देण्यात आली. उत्कृष्ट यश मिळवलेल्या शाळेतील विद्यार्थिनींना यावेळी गौरविण्यात आले. यशस्वी महिलांच्या यशोगाथाही सांगण्यात आल्या.
शाळेच्या या उपक्रमात गावातील महिला उत्साहाने सहभागी झाल्या होत्या. या उपक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा तारये मॅडम, उपाध्यक्ष वैदही आंब्रे, सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, माता बंधू भगिनी, सर्व पालक यांचे मोलाचे सहकार्य लाभले. शाळेच्या या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका भारती तायशेटे, शिक्षक-पूर्वा वाकडे, भारती शिंगाडे, राजेंद्र रांगणकर, हास्या तोडणकर मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले. शाळेच्या या उपक्रमाविषयी केंद्रप्रमुख संजय राणे, सर्व पालक यांनी कौतुक केले.