रत्नागिरी :
महिला भगिनी, कक्ष सेविका, परिचारिका, अधिपरिचारिका,परिसेविका म्हणून रुग्णांची अहोरात्र सेवा करतात,त्याच बरोबर कधीही प्रसिद्धी झोतात नसलेल्या सफाई कर्मचारी असलेल्या भगिनी, नेहमी रुग्णाच्या सेवेत मग्न असतात, यांना सन्मान पत्र देऊन तालुका शिवसेना महिला आघाडीच्या वतीने त्यांना सन्मानित करण्यात आले.
त्याच प्रमाणे परिचारिकेचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनी यांनाही प्रोत्साहित करून त्यांचा सन्मान करण्यात आला. नुकत्याच पाहिल्याच प्रयत्नामध्ये C.A. ची पदवी प्राप्त झालेल्या कुमारी अदिती प्रेरणा संदेश नागवेकर हिचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून बालविकास प्रकल्प अधिकारी इंगोले मॅडम, शहर प्रमुख स्मितलताई पावसकर , डॉ. विकास कुमरे सर, डॉ. सांगवीकर, डॉ. शिरसाट, परिसेविका सावंत सिस्टर, सागर भिंगारे हे उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन महिला तालुकाप्रमुख कांचन ताई नागवेकर, उपजिल्हाप्रमुख विनया ताई गावडे, उपतालुका प्रमुख स्मिता भिवंडे, विभाग प्रमुख शुभांगी पांडेय, रिया साळवी, ऐश्वर्या विचारे , साक्षी कुमठेकर, मेघना पाष्टे, संस्कृती पाचकुडे, स्वरा देसाई, विद्या बोंबले, स्वाती शिंदे, अपर्णा बोरकर यांनी केले.
या कार्यक्रमासाठी माजी पंचायत समिती सदस्य स्नेहल पाटील, शाखाप्रमुख अश्विनी भुरवणे, अपर्णा भोळे, कीर, राखी भोळे याही उपस्थित होत्या.