मुंबई (दि ११): काही दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यात पावसाने पुन्हा एकदा थैमान घालायला सुरूवात केली आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढला असून येणाऱ्या काळातही हा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.
१३ सप्टेंबरपर्यंत राज्यात पावासाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. राज्यातील काही जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी वीजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे.
रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही ठिकाणी रविवार पर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्या कडून वर्तवण्यात आला आहे. तर पुणे आणि सातारा जिल्ह्यात ही रविवारी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्मान झाला आहे. महाराष्ट्रातील घाट परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज आहे.