दुबई : श्रीलंकेने तब्बल आठ वर्षांनी आशिया चषकाच्या जेतेपदाला गवसणी घातली आहे. या पूर्वी त्यांनी २०१४ साली आशिया चषक स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. त्यानंतर आठ वर्षांनी श्रीलंकेने हे जेतेपद पटकावले आहे. श्रीलंकेने भामुका राजपक्षाच्या तुफानी अर्धशतकाच्या जोरावर १७१ धावांचे आवव्हान पाकिस्तानला दिले होते. त्यानंतर श्रीलंकेच्या गोलंदाजांनीही अचूक आणि भेदक मारा केला. त्यामुळे श्रीलंकेला पाकिस्तानच्या धावसंख्येला यावेळी खीळ बसवता आली. पाकिस्तानचा बाबर आझम हा श्रीलंकेच्या विजयाच्या मार्गात अडसर बनू पाहत होता.त्याने ५५ धावांची खेळीही साकारली. पण श्रीलंकेच्या डीसिल्व्हाने बाबर आझमला बाद केले आणि त्यांना मोठे यश मिळाले. श्रीलंके साठी हा एक मोठा विजय ठरला. कारण यजमान असूनही त्यांना या स्पर्धेचे आयोजन करता आले नव्हते. त्याच बरोबर या विजयाचा मोठा परीणाम त्यांच्या संघावर होईल आणि याचा फायदा त्यांना ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी नक्कीच होऊ शकतो.