Saturday, April 19, 2025
HomeSportsसचीन तेंदुलकर चा पुत्र अर्जुन ला महत्वा चा सल्ला

सचीन तेंदुलकर चा पुत्र अर्जुन ला महत्वा चा सल्ला

 

 नुकत्याच झालेल्या आय पी एल च्या सामन्यात  वानखेडे स्टेडियम वरील मुंबई इंडियन्स च्या सामन्याच्या वेळी सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर ला मुंबई च्या शेवटच्या सामन्यात  खेळण्याची संधी मिळेल अशी आशा सर्व मुंबईकरांना होती. पण या सामन्यात अर्जुन तेंडुलकरला संधी देण्यात आली नाही.

     मुंबई व दिल्ली हा महत्त्वाचा सामना दिल्ली साठी होता. शेवटपर्यंत दिल्ली संघाने जिंकण्याचा प्रयत्न केला. शेवटी मुंबईच्या पुढे त्यांना जिंकता आले नाही. अशा महत्त्वाच्या  सामन्याच्या वेळी  कदाचित अर्जुनला संधी मिळाली नसावी.

   २०२२ च्या इंडियन प्रीमियर लिग मध्ये सचिन तेंडुलकर चा मुलगा अर्जुन तेंडुलकर चे पदार्पण झाले नाही. तो फक्त मुंबई इंडियन्स संघा बरोबर सराव करीत राहिला त्याला अखेरच्या साखळी सामन्यात संधी मिळेल असे सर्व मुंबईकरांना वाटले होते. सचिन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघाचा मार्गदर्शक आहे. तरी आपल्या मुलाला संघात संधी देण्यासाठी त्याला सचीन ने कुठला ही हस्तक्षेप केला नाही. मुंबईच्या रणजी संघात अर्जुन तेंडुलकरला वगळण्यात आले आहे.

   अर्जुन तेंडुलकरला आयपीएल मध्ये मुंबई संघात खेळण्याची संधी न मिळाल्यामुळे सचिन तेंडुलकरने आपल्या मुलाला मोलाचा सल्ला दिला आहे.“क्रिकेट चा मार्ग हा आव्हानात्मक आहे. पुढेही आणखी  खडतर असेल. तुला हा खेळ आवडला आहे म्हणून तू क्रिकेट खेळायला सुरुवात केली आहेस.तू क्रिकेट खेळ व भरपूर  मेहनत घे, तुला या कष्टाचे फळ नक्कीच मिळेल.

RELATED ARTICLES

Most Popular