आय पी एल च्या १५ व्या क्रिकेट स्पर्धेची सुरुवात गत विजेता संघ चेन्नई सुपर किंग्ज आणि उपविजेता संघ कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामन्याने झाली. यावेळी आयपीएल मध्ये दहा संघ सहभागी आहेत. यावेळी आयपीएल संघांची दोन गटात विभागणी करण्यात आलीली आहे. त्याच प्रमाणे यावेळी एमएस धोनी आणि विराट कोहली कर्णधार पदाची जबाबदारी न घेता आय पी एल मध्ये खेळले आहेत.२६ मार्च ते २९ मई पर्यंत ६५ दिवस चाललेली ही क्रिकेट स्पर्धा आहे.
भारतातील ही आय पी एल जगातील सर्वात मोठी लीग आहे. ह्या वेळी विजेते पदा साठी दहा संघ आपापसात लढत होते . दरम्यान, या आयपीएल मध्ये सुमारे पन्नास कोटींची बक्षीस रक्कम आहे. विजेत्या संघा पासून ते ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप विजेत्या खेळाडूंना या स्पर्धेत बक्षीस मिळणार आहे.
विजेता संघ- २० कोटी रुपये, उपविजेता संघ- १३ कोटी रुपये, क्वालिफायर- २ संघ मध्ये पराभूत झालेला संघ – ७ कोटी रुपये, क्वालिफायर- १ मध्ये पराभूत झालेला संघ – ६ .५ कोटी रुपये मिळणार आहेत. त्याच प्रमाणे ऑरेंज कैप विनर १५ लाख रुपये,पर्पल कैप विनर १५ लाख रुपयाए,सुपर स्ट्राइक ऑफ द सीजन १५ लाख रुपये,क्रेकर इट सिक्सेस ऑफ द सीजन १२ लाख रुपये,पावर प्लेयर ऑफ द सीजन १२ लाख रुपये,मोस्ट वैल्यूएबल प्लेयर १२ लाख रुपये,गेम चेंजर ऑफ द सीजन १२ लाख रुपये,इमर्जिंग प्लेयर २० लाख रुपये मिळणार आहेत.