रत्नागिरी: यूपीएससी २०२१ अंतिम निकाल जाहीर झाला असून मुलींनी बाजी मारली आहे. देशात पहिल्या तीन क्रमांकावर मुलीच आल्या आहेत. श्रुती शर्मा देशात पहिली आली आहे. तर अंकिता अग्रवाल आणि गामिनी सिंगला यांनी अनुक्रमे दुसरा व तिसऱ्या क्रमांक पटकावलेला आहे. देशात यंदा यूपीएससीमध्ये एकूण ७४९ उमेदवार रँक मध्ये यशस्वी ठरलेले आहेत.
महाराष्ट्रातून प्रियंवदा अशोक म्हाडदळकर ही पहिली आलेली आहे. ति ऑल इंडिया रँक १३ वर आहे. टॉप-१५ मध्ये देसणारं हे एकमेव मराठी नाव प्रियंवदा चा आहे. महाराष्ट्रातील मुंबई येथील रहिवासी आणि हज हाऊस आयएएस कोचींग इन्स्टिट्यूट,मुंबई ची विद्यार्थिनी मेहविश तक हिने भारतातून ३८६ वा क्रमांक प्राप्त केला आहे.
रत्नागिरी मुख्यालयात कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक पंदेरे याचा मुलगा चेतन पंदेरे हा ४१६ व्या रँक ने उत्तीर्ण झाला.
कोल्हापूर शाहूवाडीचे आशिष पाटील तर कागलचे स्वप्निल माने याने यूपीएससी परीक्षेत यश मिळवले आहे. आशिष पाटील यांनी ५६३ वा रँक तर स्वप्निल माने आणि ५७८ वा रँक मिळविला आहे. महाराष्ट्रातील ६८५ उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत त्यापैकी रँक मध्ये ४७ उमेदवारांनी यूपीएससीच्या परीक्षेत यश मिळवले आहे.