रत्नागिरी: रेल्वे आरक्षण व तिकीट सवलत अनेक वर्षां पासून बंद असल्यामुले मराठी पत्रकार परिषदेने नाराजी व्यक्त केली.या संदर्भात मराठी पत्रकार परिषदेने थेट रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे रत्नागिरीत आले होते त्या वेळेस यांना निवेदन देण्यात आले. काही वर्षां पासून या सवलती पत्रकारांसाठी बंद असल्याने पत्रकारांना प्रवासात अनेक अडचणींंचा येत आहे. या सुविधा पुन्हा देण्यात याव्यात या मागणीचे निवेदन रत्नागिरी मराठी पत्रकार परिषदे कडून केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना रत्नागिरी दौऱ्यावर असताना सोमवारी देण्यात आले आहे .यावेळी ज्येष्ठ पत्रकार अलिमिया काझी, किशोर मोरे,मराठी पत्रकार परिषद राज्य संघटक जान्हवी पाटील, जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण देवरुखकर , रत्नागिरी तालुकाध्यक्ष आनंद तापेकर, जिल्हा कार्याध्यक्ष राजेश शेळके, माजी जिल्हा अध्यक्ष हेमंत वणजू, प्रशांत पवार, प्रशांत हरचेकर,सतीश पालकर, सचिव जमीर खलफे, अमोल मोरे, मनोज लेले, शुभम राऊत आदी पत्रकार उपस्थित होते.