Saturday, April 19, 2025
Homeरत्नागिरीमापारी मोहल्ला उर्दू शाळा चिपळूण या शाळेचा गुणगौरव रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या...

मापारी मोहल्ला उर्दू शाळा चिपळूण या शाळेचा गुणगौरव रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते

        चिपळूण तालुक्यातील उर्दू शाळेतील विद्यार्थीनी कुमारी सिद्रा मुन्ना सिद्धिकी हिने उर्दू माध्यमात रत्नागिरी जिल्ह्यातील शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत तिसरे नंबर पटकावल्याने अखिल भारतीय कवी संमेलन आणि महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटने मार्फत आयोजित मुशायरा मध्ये  जिल्हाधिकारी बी. एन्. पाटील यांच्या हस्ते पार पडला. या वेळी शाळेच्या शिक्षकांना ही गौरवण्यात आले. शाळेच्या वतीने एजाज इब्जी यांनी गौरव स्वीकारला. सदर कार्यक्रमा साठी रत्नागिरीच्या जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी मान.इंदुराणी जाखड मॅडम, शिक्षणाधिकारी मान. वामन जगदाळे, कुलहिंद मुशायरा समिती संयोजक ज्येष्ठ पत्रकार के. टी. व्ही. चे संपादक अलीमियाॅं काझी, मुशायरा समिती संयोजक महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटना अध्यक्ष मान. मुश्ताक तांबे  , हिदायत नाईक, जियाऊल्ला खान, इक्बाल दळवी, नसरीन खडस, अहमद नाडकर, अ. रहमान कुरेशी, आसिफ इब्जी, उर्दू संघटनेचे राज्य सदस्य  महंमद हनीफ इब्जी, शौकत काझी, संघटनेचे रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी , सर्व शिक्षक संघटनेचे नेते, शिक्षक पतपेढीचे संचालक तसेच भारतील प्रमुख शहरातील आलेले अनेक कवी यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

RELATED ARTICLES

Most Popular