Saturday, April 19, 2025
HomeEntertainmentबॉलिवूडचे सुप्रसिद्ध संगीतकार आणि गायक एआर रहमान यांची मुलगी खतिजा हिचे लग्न...

बॉलिवूडचे सुप्रसिद्ध संगीतकार आणि गायक एआर रहमान यांची मुलगी खतिजा हिचे लग्न थाटामाटात

बॉलिवूडचे सुप्रसिद्ध संगीतकार आणि गायक एआर रहमान यांची मुलगी खतिजा हिचे लग्न थाटामाटात झाले. हे लग्न चेन्नईत झाले आहे. चाहते नवीन जोडप्याचे आणि ए आर रहमानचे अभिनंदन करत आहेत. खतीजाचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. चाहते आणि सेलिब्रिटीही त्याचे अभिनंदन करताना दिसत आहेत. 

एवढ्या मोठ्या स्टारचा जावई कोण?

ए आर रहमान यांचा जावई कोण आहे ए आर रहमानने आपल्या इंस्टाग्रामवर लग्नाचा फॅमिली फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये मुलगी आणि जावईसोबत त्यांची दोन मुलं अम्मान आणि रहीमा दिसत आहे. या सोबत जोडप्याच्या बरोबरीची फोटो फ्रेम असल्याचेही पाहायला मिळते. ए आर रहमान च्या मुलीचे लग्न रियासदीन रियान शेख मोहम्मद शी झाले आहे. तो व्यवसायाने ऑडिओ इंजिनिअर आहे.खतिजा हिजाबमध्ये दिसत असल्याचे पाहायला मिळत आहे. दुसरीकडे, रियासदीन रियानने ऑफ व्हाइट शेरवानी घातली आहे. दोघेही एकत्र ट्यून करताना दिसत आहेत.

     सेलिब्रिटींनी अभिनंदन केले. सुप्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल हिने गायिकेच्या या कौटुंबिक फोटोवर कमेंट करून त्यांचे अभिनंदन केले आहे. यासोबतच बॉलीवूडचे निर्माते बोनी कपूर यांनीही खतिजाला तिच्या नवीन प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत

RELATED ARTICLES

Most Popular