अलिगडचा फलंदाज रिंकूसिंग २०१८ पासून आय पी एल मध्ये खेलतो आहे. रिंकूची क्रिकेट मधील वाटचाल अतिशय काटेरी आसी होती. आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुले दहावी आधीच शिक्षण सोडावे लागले. वडील खानचंद्रसिंग हे एका खासगी सिलिंडर एजन्सीस कर्मचारी चा काम करित होते. पाठी वरून घरोघरी सिलिंडर पोहोच करण्याचा काम करित होते. पाच भाऊ-बहिणीं मध्ये रिंकू तिसऱ्या नंबरचा आहे.रिंकूसिंग घरची परिस्थिती चांगली नसल्याने त्याने सफाई कर्मचारी चा काम केला. रिंकूसिंगचे क्रिकेटवर प्रेम होते. सफाई कामगार म्हणून वेळ दिल्या नंतरचा वेळ खेळा साठी असायचा . त्याचे हे श्रम फळाला आले. यशस्वी क्रिकेटपटू बनण्याच्या मार्गात त्याला पुढील शिक्षण मात्र घेता आलेले नाही. रिंकूसिंगला २०१७ च्या लिलावात पंजाब किंग्सने दहा लाख रुपयांत घेतले होते. खेळण्याची संधी मात्र केकेआरने २०१८ ला त्याला दिली. चार सामने तो खेळू शकला होता. २०१९ च्या पर्वात पाच, तर २०२० ला केवळ एकच सामना खेळता आला होता. २०२१ ला जखमी असल्याने तो लीग मधून बाहेर होता. यंदा च्या मेगा लिलावात केकेआरने रिंकूला ५५ लाख दिले आहेत .