मागील २०१९,२०२० व २०२१ वर्षा पासून देशातील सर्वच लोकांना कोरोना च्या साथी मुळे कोणतेही सण आनंदाने साजरे करता आले नाही. सर्व धर्माच्या लोकांनी साधेपणाने आपापले सण लॉकडाऊन मुळे घरी साजरे केले होते.सर्व प्रार्थनास्थळे बंद होती ती परत लॉकडाऊन उठल्या नंतर सुरू करण्यात आली,आता लॉकडाऊन कालावधीनंतर कोरोना भारतातून कमी झाल्या मुळे गणेश चतुर्थी,नाग पंचमी, रमजान ईद,बकरी ईद मोहरम, संक्रात,ओनम,महाशिवरात्री, बैसाखी, क्रिसमस, दसरा, होली, बुद्ध पूर्णिमा, महावीर जयंती, गुढी पाडवा, भाऊबीज, दुर्गापूजा, राम नवमी,पारसी नवीन वर्ष,गोकुळाष्टमी,दिवाली,रक्षाबंधन, शिवजयंती, इत्यादी धार्मिक सण आनंदाने साजरे करता येत आहेत. त्याच प्रमाणे स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिन ही आनंदात साजरा करण्यात आले.इतर वर्षा पेक्षा या वर्षी सण साजरे करताना लोकांमध्ये उत्साह जास्त प्रमाणात दिसून येत आहे.
आज ठिक ठिकाणी जत्रा, मेला लागत आहेत.लहान मुलांन पासून ते मोठ्या वृद्धां पर्यंत आपापल्या सणासुदी ची मजा घेताना दिसत आहेत. मनमोकळे पणाने रस्त्यावरून फिरून आनंद घेताना दिसुन येत आहेत. लाॅकडाऊन च्या काळात विद्यार्थी शाळेत ही जाऊ शकले नाहीत. ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थी शाळेचे शिक्षण घेत होते. परीक्षाही ऑनलाइन पद्धतीने झाल्या. जे शाळेत जाऊन शिक्षण मिळत होते आणि शिक्षकांचे प्रेम व शिक्षकांची ताकिद ऐकायला मिळत होती ते ऑनलाईन च्या शिक्षणात विद्यार्थ्यांना मिळत नव्हते. त्यामुळे किती विद्यार्थी शिक्षणात परिपक्व झाले असतील हे अता शिक्षकच सांगू शकतील. ज्या वेळी शाळा सुरू झाल्या तेंव्हा सर्व शिक्षक,राजकारण व समाजकरण क्षेत्रातील लोकांनी शाळेच्या गेट वर राहून पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन व ढोल ताशे लेझिम च्या गजरात स्वागत केले.
लाॅकडाऊनच्या कालावधीत अनेकांच्या नोकर्या ही गेल्या त्या मुळे लोकांना घरात खाण्यासाठी अन्न धान्य नाही. अशा परिस्थितीत काही सामाजिक संस्थांनी मदतीचा हात पुढे करून लोकांना मदत केली होती. कोरोना अजुन पूर्ण पणे गेलेला नाही. यासाठी सरकारने स्वतः ची काळजी स्वताः च घेण्या साठी सांगितले आहे. सोशल डिस्टंसिंग आज गरजेचे आहे. म्हणून तर महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकार्यांनी मुख्यमंत्र्यांना सर्व जनतेला मास्क लावण्याची विनंती मांगणी केली आहे. काही माणसे तर अजून मास्क वापरून स्वतःची काळजी घेत आहेत. आणि ती घेतीलच पाहिजे.
अर्थात करोना मुळे लोकांना सुख आणि दुःख काय आहे ते समजले. मदत करण्या ची व घेण्याची वेळ कोणावर ही येऊ शकते, या वेळेस कोणी ही जात धर्म न पाहता सढल हस्ते मदत केली म्हणून लोकांनी परस्परातील भेदभाव तसेच जातीय भेदभाव विसरून एकमेकां जवळ सलोख्या नी रहावे.
(शब्बीर वस्ता रत्नागिरी)